रा.से.यो श्रमसंस्कार शिबिराचे येसंबा येथे उद्घाटन
कन्हान : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर संलग्नित श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स सालवा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे (दि.२१) मार्च ते २७ मार्च २०२२ या सात दिवसीय निवासी शिबिराचे येसंबा ता. मौदा या गावी उद्घाटन महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव मा. श्री विजयरावजी कठाळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणुन रा.तु.म कला महाविद्यालय देवलापार येथील संस्था सचिव श्री प्रवीण गजघाटे सर होते. तसेच ग्रामीण विकास विद्यालय सालवा येथील मुख्याध्यापक मा. श्री राजेशजी मोटघरे सर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशि क्षक श्री भानुप्रताप सर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटना प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुप्रिया पेंढारी मॅडम यांनी प्रास्ताविकातुन शिबिराची माहिती दिली. रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण काळे यांनी सात दिवसीय कार्यक्रम पत्रिकेचे वाचन केले. संचालन प्रा.ज्योती काळे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पल्लवी मॅडम यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित होते.