टेकाडी चा पारंपरिक रामनविमी ते हनुमान जयंती सप्ताह सपन्न

कन्हान : – टेकाडी गाव हे प्रभु श्री रामचंद्र प्रशित भुमी असुन वर्षानुवर्षा पासून रामनवमी ते हनुमान जयंती सप्ताह चा कार्यक्रम आयोजित केला जातो. कोरोना काळा तील दोन वर्ष सोडले तर यावर्षी श्री रामनवमी ते श्री हनुमान जयंती २४/७ हरिनाम सप्ताह साजरा करून भव्य महाप्रसादाचा पंचकोशीतील भाविक मंडळीने महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी व्दारे श्री रामनवमी ला दुपारी १२ वाजता श्री हनुमान मुर्ती चा अभिषेक व घट स्थापना करून सतत सात दिवस भजन मंडळाचा उभा पाहरा सुरू करित विविध भज न मंडळाने २४ तास ७ दिवस उभे राहून श्रीराम व श्री हनुमान चे नाम स्मरण करित भजन करण्यात आले. या भजना मध्ये लहान मुला पासून ते वयोवृद्ध मंडळी ने सहभाग घेतला होता. रविवार (दि.१७) ला ७ व्या दिवशी वारकरी भजन मंडळीने गोपाल काल्याचे भज न व फुगडी खेळुन गोपाल काला करण्यात आला. काल्याचा प्रसाद वितरणा नंतर घट मंदिरातून पुजारीने डोक्यावर घेऊन गावा सभोवताल प्रदक्षिणा घालुन घटा चे राम सरोवरात विसर्जन करण्यात आले. यात श्री देवमनजी हुड भजन मंडळ टेकाडी, गोपिचद्रं गुरधे भजन मंडळ, जय दुर्गा भजन मंडळ, अतुल खेडकर शिवशक्ति भजन मंडळ, आरती भजन मंडळ, जय रघुनंदन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ सह इतर भजन मंडळीने भजन गात गाव प्रदक्षिणा घात ली. सायंकाळी महाप्रसादाला सुरूवात करून पंच कोशी परिसरातील भाविक भक्तानी पंगती मध्ये बसुन महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी नागपुर जि प अध्यक्षा सौ, रश्मी बर्वे, प स सभापती मिना कावळे, पं स सदस्या करूणा भोवते, टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम, आम दार आशिष जैस्वाल, माजी मंत्री राजेन्द्र मुळक, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, माजी आमदार डी एम रेडडी, नरेश बर्वे, शिवकुमार यादव, उमाशंकर सिंह, रामभाऊ दिवटे, बन्टी आकरे, साबीर सिध्दीकी, उमेश कुंभलकर, सुरेश गुरव सह टेकाडी ग्रा प सदस्या सह मान्यवरांनी मंदीरात भेट देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री हनुमान देवस्थान टेकाडी चे अध्यक्ष पंढरी बाळबुधे सह पदाधि कारी, सदस्य व समस्त टेकाडी ग्रामवासीयानी सहकार्य केले.

शिव पंचायत मंदिर कमेटी गांधी चौक, कन्हान

शिव पंचायत मंदिर कन्हान येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन शनिवार (दि.१६) ला हनुमान जन्मोत्सव दिनी सकाळी मंदिरात विधिवत पुजा अर्चना, घट स्थापना, हवनयज्ञ करुन करणात आले. दुपारी भजन कीर्तन कार्यक्रम करून आले सायंकाळी विधिवत पुजा अर्चना व आरती करण्यात आली. तदं तर महाप्रसाद वितरण करून हनुमान जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वि तेकरिता शिव पंचायत मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव, उपाध्यक्ष सुरेंद्र शर्मा, सचिव उमेश यादव, कोषा ध्यक्ष नंदलाल यादव, मार्गदर्शक राजेश यादव, भरत सावळे, शुभम यादव सह भाविकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

"डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया" या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता स्वनियमन संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा समावेश (महाराष्ट्र दर्पण न्यूज पोर्टलचा समावेश)

Sat Apr 23 , 2022
“डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता स्वनियमन संस्थेशी संलग्न महाराष्ट्रातील 72 न्यूज पोर्टलचा समावेश (महाराष्ट्र दर्पण न्यूज पोर्टलचा समावेश) नवीदिल्ली (प्रतिनिधी) भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta