*गुन्हेशाखेला मदत केल्यास ठाणेदार कडुन युवकांना चोप
*पोलीस निरीक्षक काळे यांच्यावर कारवाही न केल्यास आमरण उपोषण
*गॅरेज चालकास मारहाण केल्याने ठाणेदार विरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी
* गॅरेज संचालक आंनद नायडुची पत्रपरिषदेत घेऊन न्यायायी मागणी.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्याचा बोलबाला असुन आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर (ग्रा) ला सहकार्य करण्या-या गॅरेज चालकास पोलीस स्टेशन ला रात्री बोलावुन ठाणेदारने मारहाण केल्याने पोलीस स्टेशनला संतप्त नागरिकांनी घेराव करून हेतूपुरस्पर मारहाण केल्याचा आरोप करून गॅरेज चालक आंनंद नायडु यांच्यावर झालेल्या अन्याया विरूध्द विलास काळे यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली आहे.
कन्हान औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जातात. कन्हान मध्ये औद्योगिक संस्था हळूहळू बंद होत असताना, कन्हान पोलीस स्टेशनला “रक्षकच भक्षक” ची भुमिका ठाणेदार विलास काळे करित वरिष्ठाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असुन कोळसा, रेती, लोंखंड, डिझेल, घरफोडी, चो-या वाढुन नियमाना धाब्यावर टागुन सट्टा, जुआ, अवैद्य दारू, नसिले पदार्थ विक्री बिनधास्त असल्याने असामाजिक तत्वाला ऊत येऊन सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण होत आहे. गुन्हेगारास पाठीला व फिर्यादीस वेठीस धरल्या जात असल्याने परिसरात शांती
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी कन्हान कांद्री सीमेवर असलेल्या दिल्ली बिअरबार मध्ये मारपीट व दरोडा तसेच धारधार शस्त्राने जिवेमारण्याचा पर्यंत केलेल्या फरार आरोपी पकडण्यास गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकला मदत केल्याने गॅरेज संचालक आनंद नायडू आणि आंनद डिझेल रिपेअरिंगचे ऑपरेटर सचिन यादव यास सोमवार ( दि.२५) एप्रिल रोजी कन्हान ठाणेदार पोलीस स्टेशन ला आपल्या चेंबरमध्ये रात्री १०.३० वाजता बोलावुन शिवीगाळ करून तुझा बाप कोण ? बोलव बापाला.. म्हणुन बेधम मारहाण केल्याने स्थानिक नागरिकांनी कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करित ठाणेदार विरूध्द संताप व्यक्त करित आनंद नायडु यांची वैद्यकीय तपासणी करिता नेले असता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान डॉक्टरांनी नागपूर मधील शासकीय रुग्णालयात पाठविल्याने तेथील वैद्यकीय तपासणीत मारहाणीच्या घटनेला दुजोरा मिळाला. यामुळे गुन्हा नसताना कन्हान ठाणेदार विलास काळे यानी हेतूपुरस्पर बाजीरावने हाथावर व हाता ने कानावर मारल्याने झालेल्या दुखापती च्या अन्याया विरूध्द गॅरेज संचालक आंनंद नायडु यांनी पत्रपरिषद घेऊन कन्हान ठाणेदार विलास काळे विरूध्द गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली असुन न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याचा इशारा दिला. पत्रपरिषदेला कॉंग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण उपाध्यक्ष नरेश बर्वे, नगरपरिषद विरोधी गट नेता मनिष भिवगडे, माजी न.प.उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, महिला कॉंग्रेस अध्यक्षा रिता बर्वे, नगरसेविका गुंफा तिडके, पुष्पा कावडकरनग, रेखा टोहणे, अमोल प्रसाद, प्रशांत मसार, सतिष भसारकर, रामचंद्र कुशवाह, औसत शेख, नागेश्वर आकरे, अमित सिंग, प्रताप सिंह राजपुत, कुलदिप सिंग भंडारी, रोहीत माहुल, सुनिल आंबागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
आनंद नायडू आणि सचिन यादव ही दोघे आरोपी क्रांन्दी-कन्हान रोड वर जय दुर्गा सभागृहाच्या मागच्या बाजुला अवैध जुआ चालवत असुन दोंघाच्या आपसात हाणामारी झाल्याने तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन ला आल्याने मध्येच कुणाचा तरी फोन आल्याने पोलीस स्टेशन येथुन निघुन गेले. सुरू असलेले अवैध धंदे बंद केल्याने रोष म्हणून खोटे आरोप करीत आहे.
विलास काळे
पोलीस निरीक्षक कन्हान