ऑपरेशन लोटसविरोधात आपचा संताप; नागपुरात निषेध आंदोलन
कन्हान,ता.२५
पंजाबमधील राजकीय घडामोडींवरून आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, भाजपवर लोकशाहीची थट्टा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाबमधील आप सरकारविरोधात ‘ऑपरेशन लोटस’ राबविल्याचा आरोप करत नागपुरात आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदविला.

यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी पंजाबमधील जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. काही नेत्यांवर गद्दारी केल्याचा आरोप करत त्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, सर्व कार्यकर्ते एकत्रित राहून पक्ष नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने संबंधित नेत्यांविरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले. “आम आदमी पार्टी जिंदाबाद”, “लोकशाही वाचवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात ज्ञानेश्वर नारद दारोडे (जिल्हा संघटन मंत्री), दिनेश बरबटे, कैलाश मसराम, सौरभ यादव (कांद्री), समाजसेवक पवन कुंभलकर, निखिल टांडेकर, मंगेश बरबटे, करण खडसे, अंकित पानतावणे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.







