Home महाराष्ट्र कन्हानमध्ये २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा रंगणार

कन्हानमध्ये २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा रंगणार

0
182

कन्हानमध्ये २००० बॅचचा सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन सोहळा रंगणार

कन्हान,ता.१ मे – सुनील सरोदे 

येथील बाळीराम दखणे हायस्कूल (विकास)च्या २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे सिल्व्हर जुबली स्नेहसंमेलन रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत शाळेच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्ताने नुकतीच मुख्याध्यापकांशी चर्चा करून कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमात शाळेतील विद्यमान व निवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ, मोमेंटो व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे.

यावेळी विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देणारे विविध खेळ, वृक्षारोपण तसेच संगीतमय मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गारवा निर्माण करणारे आकर्षक डेकोरेशन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच शाळेला उपयुक्त अशी भेटवस्तू देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांकडून योगदान स्वीकारण्यात आले असून, त्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. “हा आपल्या शाळेचा गेट-टुगेदर असून, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे,” असे आवाहन २००० बॅच विद्यार्थी संघातर्फे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शरद दुधपचारे, प्रवीण गडे, विशाल पंडितकर, आशिष मुंगले, ममता मेश्राम, अमोल साकोरे, दीपक धोटे, मनीष निंबाळकर, सुशील सोनटक्के, गणेश कापसे, रोशन तायडे, अमित वानखेडे, गोपाल मसार आदी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here