Home Breaking News पारस माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे...

पारस माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे थाटात उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

0
33

पारस माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती

रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे थाटात उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

कन्हान,ता.१५ 
पारस मोरेश्वर माकडे यांची रामटेक तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समस्त पदाधिकारी व समाजबांधवांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सामाजिक, संघटनात्मक व युवकांच्या प्रश्नांवर सक्रिय कार्य करणाऱ्या पारस माकडे यांच्या नियुक्तीमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कन्हान येथील महाकाली कॉम्प्लेक्समध्ये रेणुका पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. “वीर पुत्र शहीद प्रकाश देशमुख” यांच्या वीरमाता लिलाबाई देशमुख तसेच राधेश्याम हटवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पारस माकडे यांनी उपस्थित मान्यवरांचे “वाढदिवस भेट” म्हणून ‘ग्रामगीता’ ग्रंथ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला अनिल बजाईत, जिल्हा कार्यवाह सूर्यभान चकोले, विलास घारपींडे, रामटेक तालुकाध्यक्ष बबीता कोठेकर, ऋषभ बावनकर, हरिभक्त परायण कल्पना विजय देशमुख, महिला अध्यक्ष पारशिवनी सुनिता मानकर, सुषमाताई मस्के, भैय्यालाल माकडे, मोरेश्वर माकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कृणाल माकडे, रोशनी झोड, रितिक महाजन, विजय देशमुख, प्रवीण देशमुख, बाल्या भाऊ आकरे, नुपूर बजाईत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी कांचनमाला मोरेश्वर माकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी अविनाश कांबळे, राजू मस्के, नीलकंठ मस्के, प्रशांत मसार, मोहन जाधव, कमल यादव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here