0
66

सावनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी

सहा तोळे सोने १० हजार नगदी घेवून चोर पसार

सावनेर : घरातील सर्व मंडळी कळमेश्वर येथे लग्नाला गेली असता चारट्यांनी दिवसा ढवळ्या घराचे कुलूपाचा कोडा तोडून सहा तोळे सोने व दहा हजार नगदी घेऊन चोर पसार झाला. ही घटना आज सोमवार दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 4:30 च्या सुमारास ढोमणे ले आऊट येथे घडली. सारंग धनराज लांजेवार असे चोरी झालेल्या घरमालकाचे नांव आहे.सारंग लांजेवार हे शिक्षक असून त्यांची आई वडील पत्नी व मुलगी असा संपुर्ण परीवार घेवून 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. घराचे दाराला कुलुप लावुन कळमेश्वर येथे नातेवाईकाकडे लग्न कार्यक्रमाकरीता गेले होते. लग्न लावुन त्यांचे आई वडील हे सायंकाळी 4 वा सुमारास एस टी बसने कळमेश्वर येथुन घरी परत आले तेंव्हा त्यांना घराचे दाराला लावलेल्या कुलूपाचा कोंडा तुटलेला दिसला, याची माहीती वडीलांनी सारंगला फोनवर दिली तेंव्हा सारंग हा लग्नातून परत आला तेंव्हा त्याला घरातील लोखंडी कपाटातील आलमारीतील कपडे व इतर साहीत्य खाली जमीनीवर, तसेच बाजुचे लाकडी दिवान वर अस्तव्यस्त पडलेले दिसले तसेच सदर लोखंडी (कपाट) आलमारीचे लॉकर मध्ये एका कापडी बॅगमध्ये ठेवलेले सोन्या चादीचे दागीने दिसले नाही सदर बँगमध्ये 2008 मध्ये घेतलेले 1) सोन्याची पाचवी 810 मिली ग्राम कि, 979 रु 2) ठप्पा अंगठी 5.020 मिली ग्राम कि. 6049 रु सन 2017 मध्ये घेतलेले 3) सोन्याचे बांगड्याचा जोड वजन 30.150 मिली ग्राम, व लेडीज अंगठी 4.070 मिली ग्राम कि. 1,04,233 रु 4) कानातील टॉप्स (झाला जोड) वजन 5.500 मिली ग्राम व डोरल वजन 1,200 मिली ग्राम कि. 20,174 रु सन 2024 मध्ये घेतलेले सोन्याची नथ वजन 0.950 मिलीग्राम कि. 7,054 रु सन 2025 मध्ये घेतलेले एक ठप्पा अंगठी वजन 2.020 मिलीग्राम कि. 27,452 रु असा एकुण सहा तोळयांचा ऐवज तसेच लाकडी ड्राव्हर मध्ये ठेवलेले नगदी 10,000 रु. कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याचे दिसताच सारंग यांनी सावनेर पोलिसांना माहिती दिली. सावनेर पोलिसांनी अज्ञात चोराविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here