Home विदर्भ टेकाडी (को.ख.) येथे ४.३७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

टेकाडी (को.ख.) येथे ४.३७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

0
154

टेकाडी (को.ख.) येथे ४.३७ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

कन्हान,ता.१६
टेकाडी (को.ख.) गावाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या सुमारे ४ कोटी ३७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (१५ मार्च) खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
या निधीतून गावात मुख्य सिमेंट रस्ता, हनुमान मंदिर ते चार खोली सिमेंट रस्ता, महाजन नगर येथे कौशल्य विकास केंद्र, भूमिगत नाल्यांचे बांधकाम, ‘परमात्मा एक’ भवनाचे सुशोभीकरण तसेच अद्ययावत ई-लायब्ररी उभारण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
या सोहळ्याला माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी सभापती मीना कावळे, नरेश बर्वे, चंद्रमणिजी भेलावे, सरपंच विनोद इनवाते, ग्रामपंचायत सदस्य अर्चना वासाडे, तारकेश्वरी मोरे, संध्या सिंह, पायल झोड, मीना झोड, सतीश घारड, अशोक दलाल, राहुल डोरले (ग्रामविकास अधिकारी) यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य सतीश घारड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी गावासाठी उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. “मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन सतीश घारड यांनी केले तर आभार राजकुमार वझेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here