Home Breaking News उन्हाच्या झळांत नागरिकांना दिलासा; किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक प्याऊ सुरू कन्हानमध्ये...

उन्हाच्या झळांत नागरिकांना दिलासा; किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक प्याऊ सुरू कन्हानमध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन

0
57

उन्हाच्या झळांत नागरिकांना दिलासा; किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक प्याऊ सुरू

कन्हानमध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन

कन्हान, ता. ८ – सुनील सरोदे 
वाढत्या उन्हामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची दखल घेत कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर बेलसरे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक पाणी प्याऊ सुरू करण्यात आले. आंबेडकर चौक येथे झालेल्या या उपक्रमामुळे प्रवासी, कामगार, विद्यार्थी तसेच नागरिकांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे.

कन्हान शहरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळेत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गरज ओळखून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता आंबेडकर चौक येथे सार्वजनिक पाणी प्याऊचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी सुनील लाडेकर, अशोक हिंगणकर, गणेश पानतावणे, नरेंद्र वाघमारे, पुरंदास तांडेकर, श्रीराम नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याची भावना जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले. उन्हाळ्यात नागरिकांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यानंतर कन्हान युथ फाऊंडेशनच्या वतीने विवेकानंद नगर येथील निवासस्थानी वाढदिवसानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून किशोर बेलसरे यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॅप्टन सतीश बेलkसरे, देविदास तडस, सूर्यभान फरकाडे, नितेश भरणे, गणेश रामापुरे, शैलेश झेंडे, आकाश भगत, दिगंबर हारगुळे, अमित बेलसरे यांच्यासह फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच नथु चरडे, रमेश खंडेलवाल, राजू इंगोले, संतोष पाली, रमेश जामदार, चेतमणी मिश्रा, गुडा सूर्यवंशी, अमोल साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here