सावनेर पोलिस ठाण्याला मिळाल्या पहिल्या महिला अधिकारी ऋतुजा जाधव
सावनेर ः पोलीस स्टेशन सावनेर ला इतिहासात पहिल्या महिला ठाणेदार म्हणून ऋतुजा जाधव यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई शहर पोलीस मधुन थेट त्याची बदली ग्रामीण पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी सावनेर पोलीस स्टेशन ची सुत्र ठाणेदार उमेश पाटील यांच्याकडून स्वीकारत आपल्या सेवेला सुरुवात केली. सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गतच्या भौगोलिक, आध्यात्मिक स्थीतीसह अवैधरित्या चालणाऱ्या गावठी दारु,अमली पदार्थ,फोफावत असलेल्या लाँज संस्कृती, अवैध जुगार व्यवसाय,अवैधरित्या होत असलेल्या रेती परिवहन अश्या अवैध व्यवसायासोबतच अवैध पार्किंग, मुख्य रस्त्यावरील धोक्याचे वळण,ब्लाँक स्पाँट, दुर्घटनाग्रस्त ठीकणे आदी विषयावर त्यांचे विशिष्ट लक्ष राहणार असल्याचे सांगत लवकरच उपाययोजना करण्याची तसेच बसस्थानक,शाळा काँलेज ,शिकवणीवर्ग दरम्यान रस्त्यावर होत असलेल्या टवाळखोरी, स्टंटबाजी, रफ ड्रायव्हिंग आदींवर आळा घालण्यासाठी तत्परतेने उपाययोजना होणे गरजेचे आहे जेणेकरून अप्रीय प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांनी सांगितले.
तसेच रुजू होताच नुकतीच त्यानीं सावनेर तालुक्यातील पाटणसांवगी येथे लॉजवर सुरु असलेल्या देह व्यापारावर मध्यरात्री मोठी कारवाई केलीली असुन पुढील तपास पो.नी. ऋतुजा जाधव व त्यांची टीम करीत आहे









